Posts

Showing posts from September, 2025

छोट्या हातांची मोठी कमाल...

Image
  छोट्या हातांची मोठी कमाल... चिमुकल्यांच्या श्रमातून माझं घरच्या भिंती बोलू लागल्या लातूर समाजातील शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना   शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांना सुलभ पद्धतीने   शिक्षण घेता यावे. यासाठी औसा तालुक्यातील बुधोडा-वान्ग्जेवाडी येथील माणूस प्रतिष्ठान द्वारा संचलित 'माझं घर' मध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत असून शरद झरे व संगीता झरे यासाठी पुढाकार घेत आहेत. विद्यार्थ्यांना प्रकल्पामध्ये गांधीजींच्या नई तालीम संकल्पनेवर आधारित स्वावलंबणाचे   धडे   दिले जातात. गतवर्षी मुलांनी स्वतः तयार केलेल्या आकाश कंदील, उटणे, पणत्या विक्रीतून मिळालेल्या पैश्यातून प्रकल्पातील भिंतीवर रंगवलेली चित्रे व रेखाटलेल्या माहितीच्या माध्यमातून भिंतीही बोलक्या झाल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची शिक्षणात रुची वाढत आहे. सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त असे पाठ भिंतीवर रंगवले आहेत.   विद्यार्थ्यांच्या   ज्ञानात भर घालणारी माहिती...