दिव्यांगांना कमी समजू नका, खूप सक्षम आहेत फक्त संधी द्या

-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्राची गुजर यांचे आवाहन















लातूर

परदेशात दिव्यांगांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या पाहिल्यास लक्षात येते की आपल्या देशात दिव्यांगांना सुविधा मिळत नाहीत व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते पात्रता असूनही संधी मिळत नाहीत व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक नाही. दिव्यांग करू शकत नाहीत अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही म्हणून दिव्यांगांना कमी समजू नका ते खूप सक्षम आहेत फक्त संधी द्या, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा यशोवाणी सामाजिक संस्थेच्या संस्थापक प्राचीताई गुजर यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूर दिव्यांग प्रकोष्ठ च्या वतीने 'दिव्यांगांच्या समस्या व समाजाद्वारे समाधान' या विषयावर ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व यशोवाणी सामाजिक संस्थेच्या संस्थापक प्राचीताई गुजर या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दिव्यांगांना समाजात अधिक संधी व सुलभता मिळावी म्हणून एकत्रित काम करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीतून अनेक संस्था दिव्यांगांसाठी काम करतात परंतु त्यासोबतच आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या संस्थांची उणीव भासू देऊ नये हेही समाजाचे कर्तव्य आहे. आपण समाज म्हणून सहानुभूतीतून मदत करतो. सोबतच दिव्यांगांसोबत घट्ट नातं तयार केलं पाहिजे. अपंगत्व त्रासदायक असले तरी दिव्यांग व्यक्ती दुर्बल नसतात त्यांना आपणच स्पेशल, स्पेशल म्हणून वेगळे ठेवतो. त्यांना स्पेशालिटी नकोय तर सोशालिटी हवी आहे. मदतीच्या असंख्य हातांपेक्षा हक्काचा एक हात हवा आहे. तो ते केव्हाही धरू शकतील हे कर्तव्य म्हणून केलं तर त्यातच आपलेपणा निर्माण होईल आणि यातच खरं आत्मिक समाधान मिळेल.
अरे कार्यालयांमध्ये दिव्यांग आमची गैरसोय टाळण्यासाठी एक खिडकी योजना सारख्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. दिव्यांगांना विविध आस्थापनांमध्ये आपण नोकरी देऊ शकतो का? सुविधा, विविध योजनांची माहिती देऊ शकतो का? व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने व्यासपीठ मिळवून देता येईल का? व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो का? याचा विचार करून  दिव्यांगांना समाजात संधी मिळवून देण्यासाठी त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजाने जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे,असेही प्राचीताई गुजर म्हणाल्या. व्याख्यानामध्ये त्यांनी आपल्या सुरू केलेल्या यशोवाणी सामाजिक संस्थेची वाटचाल कशा पद्धतीने झाली याचे वर्णन केले.
प्रारंभी अत्रिवरद प्रतिष्ठान ची भूमिका अध्यक्ष प्रवीण शिवणगीकर यांनी मांडली तर दिव्यांग प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा. विनोद चव्हाण यांनी व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करून शेवटी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष ॲड. योगेश कुलकर्णी, सचिव जयकिरण परदेशी, सहसचिव प्रणव शिवणगीकर, कोषाध्यक्ष प्रा. गणेश शाबादे, विश्वस्त ॲड. प्रवीण परदेशी, अविनाश शाबादे, संतोष बेंबळकर, धनंजय गुडे आदींनी परिश्रम घेतले.

By

Vinod Chavan

9175980027

Comments

Popular posts from this blog

Rare migratory birds arrive at Latur lakes

Latur couple runs ' Majha Ghar,' transforms lives of underprivileged children